ठळक मुद्देउत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे शुक्रवारी (21 डिसेंबर) भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली दबून 7 मजूरांचा मृत्यू झाला आहे. केदारनाथ जवळील महामार्गावर ही दुर्घटना घडली असून आणखी काही मजूर अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देहरादून - उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे शुक्रवारी (21 डिसेंबर) भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली दबून 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. केदारनाथ जवळील महामार्गावर ही दुर्घटना घडली असून आणखी काही मजूर अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याचं काम सुरू असताना भूस्खलन झाले. मजूर काम करत असताना मोठा भाग कोसल्याने ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.