नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. घरमालकाने क्षुल्लक कारणावरून आपल्या भाडेकरूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील हर्ष विहार परिसरात ही घटना घडली. एका भाडेकरूने घरात 100 वॅटचा बल्ब लावल्याच्या कारणावरून घरमालकाने त्याची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश कुमार असं हत्या झालेल्या भाडेकरूचं नाव आहे. 100 वॅटचा बल्बवरून वाद झाला पुढे वादाचं रुपांतर मारहाणीत झालं त्याच्यातच जगदीशचा मृत्यू झाला. घरमालकाने भाडेकरूला मारहाण केली. यामध्ये तो सोफ्याला असलेल्या लाकडावर आपटला आणि बेशुद्ध झाला. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांना त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जगदीश आणि त्याचे कुटुंबीय दिल्लीतील घरात राहत होते. जगदीशने घरामध्ये 100 वॅटचा बल्ब लावला होता. त्याचवेळी घरमालक मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरात पोहोचला. 100 वॅटच्या बल्बमुळे अधिक वीज खर्च होत असल्याचं म्हणत आरडाओरड केला. त्यानंतर त्याने तो बल्ब काढून आपल्या घरातून कमी वॅटचा बल्ब आणून दिला. ओरडण्याचा आवाज ऐकून जगदीश त्या ठिकाणी पोहोचला. घररमालकही त्या ठिकाणी होता. त्याने जगदीशवर हात उगारला. त्याचवेळी तो सोफ्याला असलेल्या एका लाकडावर आदळला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का
CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?
CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका
CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण
देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान
CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले