शिमलामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:05 AM2023-08-14T10:05:01+5:302023-08-14T10:07:20+5:30
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजता ही घटना घडली. सकाळी-सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी लोक पोहोचले होते.
शिमला - हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून येथील एका शिव मंदिराजवळ मोठं भूस्खलन झाल्याची माहिती आहे. या भूस्खलनात ३० ते ३२ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली फसल्याचे सांगण्यात येते. शिमल्यातील समरहिलजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजता ही घटना घडली. सकाळी-सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी लोक पोहोचले होते. यावेळी, लँडस्लाईड होऊन दुर्घटना घडली. येथे सातत्याने भूस्खलन होत असते, त्यात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. त्यामुळे, मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत.
Himachal Pradesh | Landslides struck a temple, posing a threat to nearby buildings. Several people stranded. Details awaited: SP Shimla Sanjeev Kumar Gandhi
— ANI (@ANI) August 14, 2023
(File photo) pic.twitter.com/BRAkKFlJVl
दरम्यान स्थानिकांच्या म्हणण्यानुसार भूस्खलनानंतर मोठ्या संख्येने लोक या मलब्याखाली अडकले आहेत. शिमलाचे पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनीही यासंदर्भात माहिती दिली आहे.