प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने निनादले शहर वहनोत्सवास प्रारंभ: टाळ, मुदंुगाचा गजर, ठिकठिकाणी रांगोळ्यांनी वहनाचे स्वागत

By admin | Published: November 14, 2015 12:06 AM2015-11-14T00:06:28+5:302015-11-14T00:06:28+5:30

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.

Launch of Nainadale City Birthday Celebrations by Lord Ramchandra: Hail of Tall, Mudunga Alar, Rangoli | प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने निनादले शहर वहनोत्सवास प्रारंभ: टाळ, मुदंुगाचा गजर, ठिकठिकाणी रांगोळ्यांनी वहनाचे स्वागत

प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने निनादले शहर वहनोत्सवास प्रारंभ: टाळ, मुदंुगाचा गजर, ठिकठिकाणी रांगोळ्यांनी वहनाचे स्वागत

Next
गाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.
गुरूवारी सायंकाळी ७ वाजता वहनोत्सवातील प्रथम घोड्याच्या वहनाच्या पूजनास प्रारंभ झाला. संस्थानचे प्रमुख विश्वस्त, गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शहरातील समस्त ब्रšावृंद यांच्या उपस्थितीत व वेद मंत्राच्या घोषात विधीवत वहनपूजन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, नगरसेवक बनसोडे, विश्वस्त वसंतराव जोशी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, सुजीत पाटील, विलास चौधरी, ओंकारेश्वर मंदिराचे विश्वस्त दीपक जोशी, बजरंग दलाचे मनोज चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दादा नेवे यांनी केले. पौराहित्य नंदू शुक्ल यांनी केले, त्यांना मुकूंद धर्माधिकारी यांनी सहकार्य केले. यानंतर प्रभू रामचंद्रांची महाआरती होऊन नंतर वहनोत्सवास प्रारंभ झाला. सद्गुरू आप्पा महाराजांचा जयघोषही यावेळी करण्यात येत होता.
-----
सनईचे सूर अन् चौघडा
घोड्याच्या वहनापुढे सनई, गुरव, वाजंत्री पथक, बॅँड पथक, झेंडेकरी, भजनी मंडळ त्यानंतर संत मुक्ताबाई पादुका पालखी त्यामगे वहन अशी पारंपरिक पद्धतीने वहनास सुरूवात झाली. सराफ बाजारातील भवानी मंदिरात सुभाष चौक पतसंस्थेतर्फे पानसुपारीचा पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर यानंतर बालाजी पेठेतील बालाजी मंदिरात पानसुपारी व भारूडाचा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते आरती झाली.
-----
रात्री ११.३० वाजेपर्यंत वहन पुन्हा श्रीराम मंदिरात आले. ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. वहनोत्सवाकरीता भानुदास चौधरी, मुकंदा पाटील, कालिदास खडके, दिलीप कुलकर्णी, महेंद्र जोशी, श्रीराम जोशी, सुनील पाटील, विकास शुक्ल, दिनेश धांडे, राजू काळे, खंडू तांबट, अविनाश येवले, जितेंद्र वाळके, परिष तांबट, गणेश दायमा, देवेश पाठक, उदय बुवा, रोहीत माळी, देवेंद्र कोळी, केशव बारी, दिलीप कोळी, जगन शिंपी, रोहित भिंगारे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Launch of Nainadale City Birthday Celebrations by Lord Ramchandra: Hail of Tall, Mudunga Alar, Rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.