यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्रमंच’चा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:57 AM2018-01-31T01:57:19+5:302018-01-31T01:57:45+5:30

केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करून देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर राजकारण बाजूला ठेवून विचारमंथन करण्यासाठी भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी ‘राष्ट्रमंच’ या व्यासपीठाची औपचारिक स्थापना केली.

 Launch of Yashwant Sinha's 'Rashtromancha' | यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्रमंच’चा शुभारंभ

यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्रमंच’चा शुभारंभ

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करून देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर राजकारण बाजूला ठेवून विचारमंथन करण्यासाठी भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी ‘राष्ट्रमंच’ या व्यासपीठाची औपचारिक स्थापना केली.
भाजपाचे आणखी एक नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याखेरीज दिनेश त्रिवेदी (तृणमूल काँग्रेस), रेणुका चौधरी (काँग्रेस), माजीद मेमन (राष्ट्रवादी) व संजय सिंग (आम आदमी) या खासदारांसह सोमपाल व हरमोहन धवन हे माजी केंद्रीय मंत्री, गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता आणि लोकदलाचे जयंत चौधरी हे या मंचात सहभागी झाले.
आज देशातील परिस्थिती ७० वर्षांपूर्वी गांधीजींच्या हत्येच्या वेळी होती तितकीच भीषण आहे व लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत, असा आरोप करून यशवंत सिन्हा यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मात्र आपला हा मंच राजकारणापासून वेगळी अश्ी राष्ट्रीय चळवळ आहे, असा त्यांनी दावा केला. ‘भाजपामध्ये आज सर्वजण भयभीत आहेत, पण आम्ही त्या भयाला जुमानत नाही’, असे ते म्हणाले. पक्षात मोकळेपणाने मते मांडता येत नाहीत, म्हणून आपण या मंचावर आलो. पण असे करणे पक्षविरोधी नाही, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

Web Title:  Launch of Yashwant Sinha's 'Rashtromancha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.