भाजपा नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:22 AM2019-09-25T10:22:12+5:302019-09-25T10:23:11+5:30
भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.
लखनौ - भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप या तरुणीवर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला असून, त्यानंतर संबंधित तरुणी आणि तिच्या अन्य तीन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.
तत्पूर्वी स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एसआयटीने मंगळवारी एसआयटीने पीडितेचे मित्र विक्रम आणि सचिन यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 95 तासांची कोठडी दिली होती. दरम्यान, मित्रांची कोठडीत रवानगी झाल्यानंतर पीडितेच्या अटकेची शक्यता वाढली होती.
उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ.पी. सिंह यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ''स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या विधी महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थिनीला एसआयटीने अटक केली आहे. तिच्यावर चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.''
Uttar Pradesh Director General of Police, OP Singh: The law student, who had accused Swami Chinmayanand for sexually harassing her, has been arrested by the SIT (Special Investigation Team) for allegedly trying to extort money from him. pic.twitter.com/gtrC5lOjhp
— ANI UP (@ANINewsUP) September 25, 2019
विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सदर तरुणीने केलेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. त्यानंतर बलात्काराचा आरोप झालेले भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली होती.