डावखु-या प्रतिभावंतांचे गोव्यात संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 04:18 AM2017-08-13T04:18:42+5:302017-08-13T04:19:10+5:30
आज १३ आॅगस्ट... आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. याचे औचित्य साधून लोटली येथील बिग फूट म्युझियममध्ये उभारलेल्या जगभरातील डावखु-या प्रतिभावंतांच्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.
मडगाव (गोवा) : आज १३ आॅगस्ट... आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. याचे औचित्य साधून लोटली येथील बिग फूट म्युझियममध्ये उभारलेल्या जगभरातील डावखु-या प्रतिभावंतांच्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. सध्या या संग्रहालयात २१ प्रज्ञावंतांचे मेणाचे पुतळे बसविण्यात आले आहेत.
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन होईल. इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबच्या नवीन अॅपचेही लाँचिंग होणार असल्याची माहिती इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबचे संदीप विष्णोई यांनी शनिवारी दिली. जागतिक मान्यता मिळालेल्या १00 डावखुºया व्यक्तींचे पुतळे टप्प्याटप्प्याने संग्रहालयात ठेवले जाणार आहेत. संग्रहालयाची माहिती प्रिन्स चार्ल्स, बिल गेट्स, लक्ष्मी मित्तल, अँजेलिना ज्योली, ज्युलिया रॉबटर््स व इतर मान्यवरांना दिलेली असून, भविष्यात ते संग्रहालयाला भेट देणार असल्याचे विष्णोई म्हणाले.
विष्णोई यांनी इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबची स्थापना केली असून, क्लबचे एक लाखावर सदस्य आहेत. डावखुºया विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, डावखुºया महिला उद्योजकांना आर्थिक साहाय्य तसेच इतर योजना या संस्थेमार्फत नियमितपणे राबविल्या जातात.
महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी...
अचाट गुणवत्तेने जगभरात नावलौकिक मिळविलेल्या डावखुºया व्यक्ती सर्वांच्या परिचयाच्या आहेत, पण ते ‘डावखुरे’ असल्याची माहिती सर्वांना असेलच, असे नाही.
संग्रहालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, चार्ली चाप्लिन, रतन टाटा, अल्बर्ट आइन्स्टाइन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, मर्लिन मन्रो, मेरी कोम, आशा भोसले, बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही पुतळ््याचा समावेश आहे.