रायबरेली (उत्तर प्रदेश) : बलात्कार पीडित मुलीने तिच्यावर अत्याचार करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी स्वत:च्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.आरोपीचे बड्या लोकांशी संबंध असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत व आरोपी माझ्यावर मी तक्रार मागे घ्यावी, यासाठी दडपण आणत आहेत. मला न्याय दिला जावा अन्यथा मी आत्महत्या करेन, असे या मुलीने २० जानेवारी रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.याबाबत सहायक पोलिस अधीक्षक शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी २४ मार्च, २०१७ रोजी दिव्य पांडे आणि अंकित वर्मा यांच्यावर बाराबंकीत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या माझ्या मुलीवर आरोपींनी बलात्कार केला व तेव्हापासून ते तिला ब्लॅकमेल करीत आहेत, असा तिच्या वडिलांचा आरोप आहे.आॅक्टोबर, २०१७ मध्ये अज्ञात इसमांवर रायबरेलीत गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीचे बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करून, त्यावर अश्लील चित्रे पोस्ट केल्याचा गुन्हा या अज्ञात इसमांवर दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे सिंह म्हणाले.या मुलीने रक्ताने लिहिलेल्या पत्राबद्दल विचारले असता, शेखर सिंह म्हणाले की, मला त्याबद्दल काही माहिती नाही. (वृत्तसंस्था)विवाहितेवर बलात्कारसामूहिक बलात्काराची ताजी घटना ५ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात घडली. भदावल खेड्याजवळील (जिल्हा बांदा) जंगलात तिघांनी महिलेचा (रा. चित्रकूट) पती आणि तिच्या दीराला ओलीस ठेवून बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हे कुटुंब बांदा-चित्रकूट सीमेवरील नदी ओलांडून पलीकडे जात असताना हा प्रकार घडला.
बलात्कारपीडितेचे मोदी, आदित्यनाथांना पत्र ; आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:12 AM