पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 07:18 PM2019-06-02T19:18:44+5:302019-06-02T19:19:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. 

letter send to bjp state president rajashan to threatened to kill pm narendra modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Next

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीवे मारण्याच्या आलेल्या धमकीवजा पत्रासंदर्भात खुलासा केला आहे. सैनी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाआधी भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाला एक पत्र आलं होतं. ज्यात मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नावानं हे निनावी पत्र आलं होतं. त्यावर भाजपाच्या मुख्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठीत लिहिलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात येणार आहेत.

ही चिठ्ठी पाठवणाऱ्यानं आपलं नावंही दिलं होतं. त्या चिठ्ठीवर पाठवणाऱ्याचा पत्ताही देण्यात आला होता. या धमकीपत्रात राकेश टांक, भैय्या पारीक, आणखी एकाचा उल्लेख होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरचा होता. चिठ्ठीमध्ये जयपूरमधल्या आमेर रोडवरच्या कच्चा बंधा, गणेश कॉलनीतील शिवाड भागाचा पत्ता देण्यात आला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी म्हणाले, चिठ्ठी मिळाल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या हवाली केली होती. पोलिसांनी त्या आरोपींवर काय कारवाई  केली हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी त्या आरोपींवर काय कारवाई केली याची माहिती घेऊन सांगेन, असंही सैनी म्हणाले आहेत. 

मोदींना आलेल्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस आणि आयबीचे अधिकारी यासंदर्भात अधिक काही सांगण्यात तयार नाहीत. या प्रकरणात लवकरच तपास पूर्ण होईल आणि आरोपींना योग्य शिक्षा देऊ, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

Web Title: letter send to bjp state president rajashan to threatened to kill pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.