दिल्लीच्या हवेमुळे आयुष्य होणार कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:50 AM2017-11-08T05:50:49+5:302017-11-08T05:50:54+5:30
दिल्लीत येताय? सावधान ! इथली हवा तुमची जगण्याची ६ वर्षे कमी करू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिल्लीत एअरलॉक होण्याची भीती व्यक्त केली आहे.
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : दिल्लीत येताय? सावधान ! इथली हवा तुमची जगण्याची ६ वर्षे कमी करू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिल्लीत एअरलॉक होण्याची भीती व्यक्त केली आहे. धुके व प्रदूषणामुळे तयार होणारे स्मॉग स्थिर राहिल्यास एअरलॉकची स्थिती निर्माण होते. वाढत्या प्रदूषणाने सरासरी आयुष्य ६ वर्षांनी घटेल, असा दावा एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी केला आहे.
...तर पर्यावरण आणीबाणी घोषित
सलग दोन दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० पेक्षा जास्त राहिल्यास पर्यावरण आणीबाणी घोषित केली जाईल. दिल्लीत नजीकच्या राज्यातून येणाºया जड वाहनांना बंदी केली जाईल. हा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे.