लिंगायत पंचमसाली आरक्षण: बेळगावात विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्न, आंदोलकांवर लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 05:55 PM2024-12-11T17:55:28+5:302024-12-11T17:55:58+5:30

लाठी हल्ल्यात अनेक जण जखमी

Lingayat Panchmasali Reservation: Attempts to surround the Legislative Assembly in Belgaum, lathicharge on protesters | लिंगायत पंचमसाली आरक्षण: बेळगावात विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्न, आंदोलकांवर लाठीचार्ज

लिंगायत पंचमसाली आरक्षण: बेळगावात विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्न, आंदोलकांवर लाठीचार्ज

बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौधसमोर पंचमसाली समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. विधानसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्नातील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या आंदोलनात काही नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे.

पंचमसाली समाजाला २ ए श्रेणीतील आरक्षण मिळावे यासाठी कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील नेत्यांनी हजारोंच्या उपस्थितीत मंगळवारी सुवर्ण सौध परिसरात आंदोलन छेडले. कोंडुसकोप्पहून सुवर्णसौधला घेराव घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आगेकूच करताच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचादेखील प्रयत्न केला. जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यावेळी पोलिस आयुक्त याडा मार्टिनदेखील हजर होते. सुमारे दहा हजारहून अधिक आंदोलक उपस्थित होते. आंदोलकांना झालेल्या लाठी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते.

आंदोलनातील कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी, विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अरविंद बेल्लद, आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Web Title: Lingayat Panchmasali Reservation: Attempts to surround the Legislative Assembly in Belgaum, lathicharge on protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.