तिरुपती मंदिरात लाडूंचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 04:49 AM2018-10-21T04:49:34+5:302018-10-21T04:49:38+5:30
प्रख्यात तिरुपती मंदिरात भाविकांना विकण्यात येणारे लाडू जादा भावाने मंदिराबाहेर विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले
तिरुमला : प्रख्यात तिरुपती मंदिरात भाविकांना विकण्यात येणारे लाडू जादा भावाने मंदिराबाहेर विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, या घोटाळ्यात तेथील कंत्राटी कामगारच सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिरुपती मंदिरात ५० रुपये व १०० रुपये या दराने अनुक्रमे दोन व चार लाडू असलेली पाकिटे विकण्यात येतात. ते लाडू मर्यादित प्रमाणात तयार केलेले असतात. या व्यवहारात कोणताही घोटाळा होऊ नये म्हणून मंदिर व्यवस्थापनातर्फे कूपन छापण्यात येतात. पण मंदिरातील काही कंत्राटी हे कूपन स्कॅन करून घेतात आणि ते भाविकांना काळ्याबाजारात विकतात. भाविकांनी जादा भावात विकत घेतलेले कूपन लाडूंच्या काऊंटरवर दिले की त्या बदल्यात लाडूंची पाकिटे मिळतात. पण पुढे तयार करण्यात आलेल्या लाडूंचा आणि कूपनांचा ताळमेळ बसत नसल्याचे लक्षात आले. तेव्हा कूपन तपासण्यास सुरुवात झाली. त्यावेळी एकाच क्रमांकाची एकाहून अधिक कूपन काऊं टरवर जमा झाल्याचे उघड झाले. आणखी तपास केला असता, मूळ कूपन स्कॅन करून ही बोगस कूपन्स तयार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला.
>याआधीसुद्धा?
१४ ते १६ आॅक्टोबरसाठी मंदिर प्रशासनाने लाडूंची ३० हजार कूपन छापली होती. काऊं टरवर सतत झुंबड उडत असल्याने त्यातून बोगस कूपन ओळखता येणार नाही, या अंदाजानेच कामगारांनी १४ हजार लाडूंचा घोटाळा केला. असा प्रकार पहिल्यांदाच झाला की यापूर्वीही होत होता, याचा तपास सुरू आहे.