पीएम केअर्स फंडावरून लोकसभेत गदारोळ; अधीर रंजन यांची अनुराग ठाकूर याच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 06:39 PM2020-09-18T18:39:18+5:302020-09-18T18:46:35+5:30

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या एका वक्तव्याने या संपूर्ण गदारोळाला सुरुवात झाली. ते सभागृहात पीएम केअर्स फंडचा हिशेब देत होते. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबाचा उल्लेख करत, ज्यांना पीएम राष्ट्रीय मदत निधीतून लाभ मिळाला, त्यांची नावे जाहीर करण्याची धमकी दिली होती.

lok sabha adjourned after rukus between treasury bench and opposition over pm cares fund | पीएम केअर्स फंडावरून लोकसभेत गदारोळ; अधीर रंजन यांची अनुराग ठाकूर याच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी

पीएम केअर्स फंडावरून लोकसभेत गदारोळ; अधीर रंजन यांची अनुराग ठाकूर याच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी

Next
ठळक मुद्देविरोधक विरोधासाठी विरोध करत आहेत. पीएम केअर्स फंड का योग्य नाही, हे त्यांनी सांगावे - ठाकूरयावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभा सभापतींवर भाजपा सदस्यांचा बचाव करत असल्याचा आरोपही केला. गदारोळ अधिक वाढल्याने लोकसभा सभापती ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज अर्ध्यातासासाठी स्थगित केले होते.  


नवी दिल्ली - पीएम केअर्स फडावरून आज लोकसभेत गदारोळ झाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याचदरम्यान काँग्रेस खासदार आधीर रंजन चौधरी यांनी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे गदारोळ अधिक वाढल्याने लोकसभा सभापती ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज अर्ध्यातासासाठी स्थगित केले होते.  

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या एका वक्तव्याने या संपूर्ण गदारोळाला सुरुवात झाली. ते सभागृहात पीएम केअर्स फंडचा हिशेब देत होते. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबाचा उल्लेख करत, ज्यांना पीएम राष्ट्रीय मदत निधीतून लाभ मिळाला, त्यांची नावे जाहीर करण्याची धमकी दिली. यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांच्या या वक्तव्याला तीव्र विरोध केला.
 
यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभा सभापतींवर भाजपा सदस्यांचा बचाव करत असल्याचा आरोपही केला. कल्याण बॅनर्जी म्हणाले, सभापती सातत्याने विरोधकांना रोखत आहेत. एवढेच नाही, तर सभापतींनी आपल्याला निलंबित केले तरी चालेल. मात्र, आता आपण हे सहन करणार नाही. यावर अधीर रंजन चौधरी यांनीही कल्याण बॅनर्जी यांचे समर्थन केले. नवनिर्वाचित सदस्यही लोकसभा विरोधकांसाठी असभ्य भाषा वापरत आहेत, असा आरोप आधीर रंजन यांनी केला. ओम बिरला यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

पीएम केअर्स फंडचा हिशेब देत होते अनुराग ठाकूर - 
यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, पीएम केअर्स फंडला विरोधक केवळ विरोध करत आहेत. त्यांनी त्यांच्या विरोधाचे कारण स्पष्ट करावे. मात्र, ते तसे न करता केवळ विरोधासाठी विरोधच करत आहेत. पीएम केअर्स फंड का योग्य नाही, हे त्यांनी सांगावे. यांना नोटाबंदी, जीएसटी, तीन तलाक सर्वच अयोग्य वाटते. पीएम केअर्स फंडावर सर्वोच्च न्यायालयानेही आपला निर्णय दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

SBI मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, ग्राहकांना होणार फायदा

भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

 

Web Title: lok sabha adjourned after rukus between treasury bench and opposition over pm cares fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.