बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 03:52 PM2019-04-07T15:52:32+5:302019-04-07T16:23:54+5:30

उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

lok sabha election 2019 in bijnor nasimuddin siddiqui congress candidate distributed biryani in supporters | बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे.बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

मुझफ्फरनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. तसेच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे.

काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला होता. त्यानुसार बिर्याणीही दिली. पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये अनेक समर्थक जखमी झाले. या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (6 एप्रिल) माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचार सभेनंतर दुपारी  समर्थकांसाठी जेवण ठेवण्यात आलं होतं. यामध्ये समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती. पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. 

गावातील लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने पुन्हा वाद झाला. दोन्ही गटांनी काठ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. बिर्याणी कमी पडल्यामुळे हा वाद सुरू झाल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली. या हाणामारीमध्ये अनेक समर्थक जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले. तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आचारसंहितेचं उल्लंघन आणि विविध कलमांखाली 34 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.' 

 

Web Title: lok sabha election 2019 in bijnor nasimuddin siddiqui congress candidate distributed biryani in supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.