चीनचं सरकारही म्हणतं, 'फिर एक बार...'; ग्लोबल टाइम्सचं मोदींना झुकतं माप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:26 PM2019-04-30T13:26:05+5:302019-04-30T13:26:19+5:30
भाजपचे पक्ष संघटन देशातील इतर राष्टीय पक्षाच्या तुलनेत शक्तिशाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येऊ शकतात. 'ग्लोबल टाइम्स' ने आपल्या लेखात हा दावा केला आहे.
मुंबई - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज चीनच्या शासकीय माध्यमांनी वर्तवला आहे. भारत देशात नरेंद्र मोदींच्या विरोधात पंतप्रधान पदासाठी सक्षम उमेदवार नाही. विरोधीपक्षाचे संघटन मजबूत नसल्याने भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा चीन सरकारचे मुखपत्र असलेले ' द ग्लोबल टाइम्स ' ने म्हटले आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याची खात्री आहे. मोदींन सारखा भारतात हुशार असा राजकीय नेता नाही. आर्थिकदृष्ट्या भाजप इतर पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. भाजपचे पक्ष संघटन देशातील इतर राष्टीय पक्षाच्या तुलनेत शक्तिशाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येऊ शकतात. 'ग्लोबल टाइम्स' ने आपल्या लेखात हा दावा केला आहे.
'मोदींनी राजकीय प्रवास चालू ठेवला पाहिजे, निवडणुकीचा निकाल काहीही लागो ' या शीर्षकाखाली 'ग्लोबल टाइम्स' मध्ये लेख लिहण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील केलेल्या प्रवासाचा कौतुक सुद्धा यात करण्यात आला आहे. चीन बरोबर भारताने संबध मजबूत करण्याचा काम केल्याचा उल्लेख या लेखात केला आहे.
देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वच विरोधीपक्ष एकत्र आले आहे. दुसरीकडे, चीनच्या सरकारी माध्यमांनी वर्तवलेला अंदाज विरोधीपक्षाला डोकेदुखी ठरणार आहे. आणखी तीन टप्यातील मतदान होणे बाकी आहे, मात्र त्याधीच चीनच्या माध्यमांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे भाजपच्या नेत्यांचा बळ वाढणार आहे.