चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:18 PM2024-06-03T13:18:49+5:302024-06-03T13:29:47+5:30
lok sabha elections 2024 : काही प्रमुख उमेदवारांबाबत एक्झिट पाेलने काय अंदाज वर्तविला आहे? जाणून घेऊ या...
नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज एक्झिट पाेलमधून वर्तविण्यात आला आहे. बहुतांश एक्झिट पाेलने एनडीएला ३५०च्या आसपास जागा दिल्या आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज उमेदवारांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. एक्झिट पाेल्सच्या अंदाजानुसार, काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात. अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव हाेण्याची शक्यता असून काही लढती अत्यंत चुरशीच्या हाेऊ शकतात, असा दावा पोलमध्ये करण्यात आला आहे. काही प्रमुख उमेदवारांबाबत एक्झिट पाेलने काय अंदाज वर्तविला आहे? जाणून घेऊ या...
वाराणसी : नरेंद्र माेदी (भाजप) विरुद्ध अजय राय (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? नरेंद्र माेदी
गांधीनगर : अमित शाह (भाजप) विरुद्ध साेनल पटेल (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? अमित शाह
अनंतनाग-राजाैरी : मियां अल्ताफ अहमद (एनसी) विरुद्ध मेहबुबा मुफ्ती (पीडीपी) काेण जिंकणार? मियां अल्ताफ अहमद
चंडीगड : मनीष तिवारी (काॅंग्रेस) विरुद्ध संजय टंडन (भाजप) काेण जिंकणार? मनीष तिवारी (चुरशीची लढत)
जाेरहाट : तपन गाेगाेई (भाजप) विरुद्ध गाैरव गाेगाेई (काॅंग्रेस) काेण जिंकणार? तपन गाेगाेई (चुरशीची लढत)
कुरुक्षेत्र : नवीन जिंदाल (भाजप) विरुद्ध सुशील गुप्ता (आप) काेण जिंकणार? नवीन जिंदाल (चुरशीची लढत)
पाटलीपुत्र : मीसा भारती (आरजेडी) विरुद्ध राम कृपाल यादव (भाजप)
काेण जिंकणार? राम कृपाल यादव (चुरशीची लढत)
बशीरहाट : हाजी नुरूल इस्लाम (तृणमूल) विरुद्ध रेखा पात्रा (भाजप) काेण जिंकणार? हाजी नुरूल इस्लाम
सांगली : संजयकाका पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (अपक्ष) काेण जिंकणार? विशाल पाटील (चुरशीची लढत)
काेइम्बतूर : के. अन्नामलाई (भाजप) विरुद्ध गणपती राजकुमार (डीएमके)
काेण जिंकणार? गणपती राजकुमार (चुरशीची लढत)
पूर्णिया : पप्पू यादव (अपक्ष) विरुद्ध संताेषकुमार कुशवाहा (जेडीयू) काेण जिंकणार? पप्पू यादव (चुरशीची लढत)
मंडी : कंगना रणाैत (भाजप) विरुद्ध विक्रमादित्य सिंह (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? कंगना रणाैत
उत्तर पूर्व दिल्ली : मनाेज तिवारी (भाजप) विरुद्ध कन्हैय्या कुमार (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? मनाेज तिवारी
पुरी : संबीत पात्रा (भाजप) विरुद्ध अरूप पटनायक (बीजेडी)
काेण जिंकणार? संबीत पात्रा
गुणा : ज्याेतिरादित्य सिंधिया (भाजप) विरुद्ध यादवेंद्र राव (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? ज्याेतिरादित्य सिंधिया
छिंदवाडा : बंटी साहू (भाजप) विरुद्ध नकुल नाथ (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? बंटी साहू
हासन : प्रज्वल रेवण्णा (भाजप) विरुद्ध श्रेयस पटेल (काॅंग्रेस) काेण जिंकणार? प्रज्वल रेवण्णा (चुरशीची लढत)
तिरुअनंतपुरम : राजीव चंद्रशेखर (भाजप) विरुद्ध शशी थरूर (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? राजीव चंद्रशेखर
बारामती : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) काेण जिंकणार? सुप्रिया सुळे (चुरशीची लढत)
राजगड : दिग्विजय सिंह (काॅंग्रेस)
विरुद्ध राेडमल नागर (भाजप)
काेण जिंकणार? राेडमल नागर
(चुरशीची लढत)
बरहामपूर : युसूफ पठाण (तृणमूल) विरुद्ध अधीर रंजन चाैधरी (काॅंग्रेस)
काेण जिंकणार? युसूफ पठाण
(चुरशीची लढत)
हैदराबाद : माधवी लता (भाजप)
विरुद्ध असदुद्दीन ओवैसी (एमआयएम)
काेण जिंकणार? माधवी लता
(चुरशीची लढत)