- हरिश गुप्ता नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक पट्ट्यातील निकाल म्हणजे २०१९ च्या निवडणुकांसाठी भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. तेलंगणात काँग्रेसला यश मिळाले नसले आणि मिझोरममध्ये असलेली सत्ता हातातून गेली असली, तरी ‘अजेय’ भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत केले जाऊ शकते, असे या निकालांनी दाखवून दिले आहे. यापैकी मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सलग १५ वर्षे भाजपाचीच सत्ता होती.शिवराज सिंह यांच्यामागे रा. स्व. संघाने आपली सारी ताकद लावूनही त्याचा उपयोग झाला नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भव्य विजय मिळविला हे या निवडणुकीतील आश्चर्य आहे. कारण याची अपेक्षा नव्हती. अजित जोगी आणि बसपाची आघाडी काँग्रेसच्या मतात घट करेल, असे बोलले जात होते, पण याच्या उलट झाले. या ९० सदस्यांच्या विधानसभेत बसपा आणि जोगी यांच्या आघाडीला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपा जेमतेम १५ जागांवर आला असून, काँग्रेसने तब्बल ६३ जागांवर विजय मिळविला आहे. राजस्थानातही भाजपाने २०१४ मध्ये लोकसभेच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या, पण आज परिस्थिती बदलली आहे.सार्वत्रिक निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असताना, हिंदी भाषिक आणि गायीचा मुद्दा चर्चिला गेलेल्या २२४ लोकसभा जागांवरून ही लढाई सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने या दहा राज्यांतून १७४ जागा जिंकल्या होत्या. या निकालांच्या आदल्या दिवशी, सोमवारी २१ विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. आता ते आणखी मजबूत होतील. बसपा व सपाचे नेते बैठकीला नव्हते. तेही आता सोबत येऊ शकतील. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी संकेत दिले आहेत की, राहुल गांधी यांनी अडथळे त्यांच्यासह काम करण्यात येणारे मतभेद दूर केले आहेत. एकत्र आलेल्या या २१ पक्षांचा हाच उद्देश आहे आणि तो म्हणजे आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करणे. कारण नरेंद्र मोदी आता अजेय राहिलेले नाहीत.धार्मिक ध्रुवीकरणाने मते आकर्षित होणार नाहीतभाजपाला वाटते की, राम मंदिराच्या मुद्द्याने मध्य प्रदेशातील घसरण रोखण्यास मदत झाली, पण पक्षातील एका वर्गाला असेही वाटते की, मोदींनी विकास अजेंड्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. धार्मिक धु्रवीकरणाने मते आकर्षित होणार नाहीत. ‘लिंचिंग’च्या घटनांमुळे भलेही हिंदुत्ववादी खुश झाले असतील, पण सरकारवर नाराज असलेल्या लोकांचे मतपरिवर्तन करण्यास याची मदत झाली नाही. द्वेष पसरविणारे योगी आदित्यनाथही अपयशी ठरले. त्यांनी असंख्य सभा घेतल्या. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, या विजयाने विरोधकांच्या एकीला मोठी उभारी मिळाली आहे. यातून नवा अध्याय लिहिला जाईल.जनता मग्रुरी सहन करीत नाही : पवारजनता कधीच गुर्मी,मग्रुरी सहन करीत नाही, असे या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 6:18 AM