...तर आजपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियम

By कुणाल गवाणकर | Published: November 1, 2020 09:17 AM2020-11-01T09:17:04+5:302020-11-01T09:17:39+5:30

LPG Cylinder Home Delivery DAC System: आजपासून १०० शहरांमध्ये डॅक लागू

LPG cylinder new rules Need to share OTP for home delivery from today | ...तर आजपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियम

...तर आजपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियम

Next

मुंबई: घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. आजपासून होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू करण्यात आली आहे. ही सिस्टिम नेमकी कशी आहे, जाणून घ्या..

- या नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा होता. त्यामुळे आता केवळ बुकिंगाच्या आधारावर सिलिंडरची घरापर्यंत डिलिव्हरी केली जाणार नाही. तर त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल. तुम्ही गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही. 

१ नोव्हेंबरपासून सिलेंडर, एसबीआय, डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम

- एखाद्या ग्राहकानं वितरकाकडे त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला नसल्यास गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडे असलेल्या ऍपच्या मदतीनं रियल टाईम नंबर अपडेट करता येईल. त्यानंतर कोड जनरेट करता येईल.

- नवी यंत्रणा लागू झाल्यावर चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील. त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी रोखली जाऊ शकते.

- तेल कंपन्या सर्वप्रथम नवी यंत्रणा १०० स्मार्ट सिटीमध्ये लागू करणार आहेत. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही यंत्रणा लागू होईल. जयपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे.

- प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आलेल्या यंत्रणेला ९५ टक्क्यांहून अधिक यश मिळालं आहे. ही योजना घरगुती वापरासाठीच्या सिलेंडरसाठी असेल. व्यवसायिक वापरासाठीच्या सिलेंडरसाठी ही योजना लागू होणार नाही.

Web Title: LPG cylinder new rules Need to share OTP for home delivery from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.