सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट सेवा पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:01 PM2018-01-25T22:01:30+5:302018-01-25T22:01:50+5:30
सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट्य शेवा मेडल जाहीर झाले आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे मुळचे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील आहेत.
नवी दिल्ली - सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट्य शेवा मेडल जाहीर झाले आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे मुळचे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील आहेत. याशिवाय देशातील 390 जवानांना सेना पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे, महाराष्ट्राच्या 22 जवानांचा यात समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये परम विशिष्ठ सेवा पदक, कीर्ती चक्र, उत्तम युद्धसेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक, शौर्य चक्र, व सेना पदक या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामध्ये निंभोरकर यांना परमविशिष्ट सेवा पदक पदक जाहीर करण्यात आले.
देशातील 28 अधिकाऱ्यांना परम विशिष्ठ सेवा पदक
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये 28 जवानांना परम विशिष्ठ सेवा पदक, 49 जवानांना अति विशिष्ठ सेवा पदक 10 जवानांना युद्ध सेवा तर 121 जवानांना विशिष्ठ सेवा पदक,14 शौर्य चक्र , 10 युद्ध सेवा पदक,तर एका जवानास कीर्ती चक्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या दोन अधिकाऱ्यांना परम विशिष्ठ सेवा पदक
महाराष्ट्राच्या २२ जवानांमध्ये २ अधिकाऱ्यांना परम विशिष्ठ सेवा पदक, ४ अधिकाऱ्यांना अति विशिष्ठ सेवा पदक, ७ अधिकाऱ्यांना सेना पदक ( शौर्य), ५ अधिकाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक , २ वायू पदक तर 1 अधिकाऱ्यास नौसेना पदक व एकास युद्ध सेवा पदक जाहीर झाले आहे.