मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. येथे काल रात्री आयोजित मशाल मोर्चादरम्यान मशालीचा भडका उडून ३० जण होरपळल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मध्य प्रदेशमधील खंडवा येथील बॉम्बे बाजार- घंटाघर येथील चौकामधून काही जणांकडून मशाल मोर्चा काढण्यात येत होता. या दरम्यान, अचानक आग भडकली, त्यात ३० जण भडकले. त्यापैकी १८ जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच एसपी, अॅडिशनल एसपी हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत सूत्रे हाती घेतली आणि मदत बचाव कार्य सुरू केलं. दरम्यान, हा मोर्चा राष्ट्रभक्त वीर युवा मंचने काढला असल्याची माहिती समोर आली आहे.