"बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल..."; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:49 AM2023-12-28T10:49:57+5:302023-12-28T10:51:48+5:30

ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले. 

Mahant Rajudas Maharaj of Ayodhya criticized Uddhav Thackeray | "बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल..."; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

"बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल..."; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

अयोध्या - राम मंदिरासाठी महाराष्ट्राच्या लोकांचे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. ज्यावेळी विवादीत ढाचा पाडला तेव्हा त्याची जबाबदारी घेणारा एकमेव नेता होता. यापुढे असा कुणी होणार नाही. परंतु आज उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली ते पाहा. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिलेत हे पाहून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल अशा शब्दात अयोध्येतील हनुमानगढीचे महंत राजूदास महाराज यांनी संतप्त भावना व्यक्त केली. 

महंत राजूदास महाराज म्हणाले की,आम्ही सनातन धर्मासाठी काम करतो, आम्ही आजपर्यंत कुणाचा अपमान केला नाही. जे सनातन धर्माच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर आम्ही बोलतो. त्यामुळे आम्ही वाईट होतो. स्व. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असेल. कारण रामाच्या विरोधात असणाऱ्यांसोबत सरकार बनवाव लागलं असतं तर  बाळासाहेबांनी अशा राजकारणाला तिलांजली दिली असती, पक्ष उद्ध्वस्त झाला असता तरी चालले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या चरणाशी गेले. ज्याप्रकारे आमंत्रणावर बोलत असतील तर ज्यांनी प्रभू रामाला धुडकावले, हा भाजपाचा इव्हेंट आहे असं बोलले. आज उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली ते पाहा. पक्ष संपला. माणसं सोडून गेली. हे पाहून मनाला वेदना वाटतात. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राम काल्पनिक आहे असं त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी म्हटलं होते.ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होत होती तेव्हा काळे कपडे घालून आंदोलन करत होते. आज त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत. ज्यांनी प्रभू रामाला तंबूत ठेवले. ज्यांनी वीर सावकरांना शिव्या दिल्या. चोर म्हटलं. वीर सावरकर हा तुमचा आदर्श आहे पण तुम्ही त्यांच्यासोबत सरकार बनवले. जो रामाचा नाही तो काही कामाचा नाही हे महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवले आहे. माझे राम मंदिर ट्रस्टला आवाहन आहे की, अनेक रामभक्तांना सोहळ्याला यायचे आहे तुम्ही त्यांना निमंत्रण द्या. रामद्रोही असलेल्यांना नको असंही महंतांनी मागणी केली. 

उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्यावरून आरोप प्रत्यारोप

राम मंदिर सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं मोठं योगदान आहे अशी आठवण करून दिली. त्यावर केवळ १ कोटी रुपये दिले म्हणून त्यांना बोलवता येत नाही.उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे. मी दोनवेळा कारसेवेत गेलो होतो, २० दिवस तुरुंगात होतो. जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तेव्हा त्यावेळीही मी तिथे होतो. उद्धव ठाकरे कोठे होते?, ते घरातच बसलेले होते असे म्हणत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर पलटवार केला होता. तर बाबरी मशिदीच्यावेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. ते खूप धाडसी होते, याची जबाबदारी भाजपमधील कुणीही घेतली नव्हती. आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाला निमंत्रित करायला हवे होते, राम मंदिर ही कुणाची एका पक्षाची प्रॉपर्टी नाही असा टोला राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. 
 

Web Title: Mahant Rajudas Maharaj of Ayodhya criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.