युपीत महंतांच्या पदत्रायेला बंदी, यती नरसिंहानंद गिरींना ३ दिवस नजरकैद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:56 PM2022-10-06T15:56:40+5:302022-10-06T16:06:30+5:30

हिंदू समाजाच्या जनजागृतीसाठी गाझियाबाद येथून मेरठपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार होती.

Mahant's office Rally banned in UP, Narasimhanand Giri 3 days house arrest | युपीत महंतांच्या पदत्रायेला बंदी, यती नरसिंहानंद गिरींना ३ दिवस नजरकैद

युपीत महंतांच्या पदत्रायेला बंदी, यती नरसिंहानंद गिरींना ३ दिवस नजरकैद

Next

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद ते मेरठ या मार्गावर होत असलेल्या पदयात्रेला थांबविण्यात आलं आहे. शिवशक्ती धाम डासनाचे पीठाधीश्वर आणि प्रपंच दशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी महाराज यांना तीन दिवसांसाठी नजरकैद करण्यात आलं आहे. यावेळी, आपणास तुरुंगात डांबून ठेवलं जाईल, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप महंत यती गिरी महाराज यांनी केला आहे. 

हिंदू समाजाच्या जनजागृतीसाठी गाझियाबाद येथून मेरठपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार होती. मात्र, पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी नाकारत निर्बंध घातले आहेत. गाझियाबादचे पोलीस अधीक्षक देहात ईरज राजा आणि एसडीएम विनयकुमार सिंह यांनी ही पदयात्रा सुरू होण्यापूर्वीच डासना येथील शिवशक्ती धाम गाठले. तसेच, सध्या कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती महंतांना दिली. 

दरम्यान, सध्या येथील महंतांच्या आखाड्यात महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी महाराज यांना तीन दिवसांसाठी नजरकैद करण्यात आलं आहे. यति नरसिंहानंद गिरी महाराज आपल्या 20 शिष्यांसह शिवशक्ति धाम डासना येथून मेरठ के गांवातील खजूरी इथपर्यंत पदयात्रा करणार होते. महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी संपूर्ण हिन्दू समाजाला स्वसंरक्षणासाठी जागरुक करणार होते. मात्र, आता पोलिसांनी बंदी घातली आहे. 
 

Web Title: Mahant's office Rally banned in UP, Narasimhanand Giri 3 days house arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.