उत्तर प्रदेशातील गाझियाबाद ते मेरठ या मार्गावर होत असलेल्या पदयात्रेला थांबविण्यात आलं आहे. शिवशक्ती धाम डासनाचे पीठाधीश्वर आणि प्रपंच दशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी महाराज यांना तीन दिवसांसाठी नजरकैद करण्यात आलं आहे. यावेळी, आपणास तुरुंगात डांबून ठेवलं जाईल, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप महंत यती गिरी महाराज यांनी केला आहे.
हिंदू समाजाच्या जनजागृतीसाठी गाझियाबाद येथून मेरठपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार होती. मात्र, पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी नाकारत निर्बंध घातले आहेत. गाझियाबादचे पोलीस अधीक्षक देहात ईरज राजा आणि एसडीएम विनयकुमार सिंह यांनी ही पदयात्रा सुरू होण्यापूर्वीच डासना येथील शिवशक्ती धाम गाठले. तसेच, सध्या कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती महंतांना दिली.
दरम्यान, सध्या येथील महंतांच्या आखाड्यात महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी महाराज यांना तीन दिवसांसाठी नजरकैद करण्यात आलं आहे. यति नरसिंहानंद गिरी महाराज आपल्या 20 शिष्यांसह शिवशक्ति धाम डासना येथून मेरठ के गांवातील खजूरी इथपर्यंत पदयात्रा करणार होते. महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी संपूर्ण हिन्दू समाजाला स्वसंरक्षणासाठी जागरुक करणार होते. मात्र, आता पोलिसांनी बंदी घातली आहे.