VIDEO : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी साजरी केली होळी, पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:26 PM2021-03-28T18:26:45+5:302021-03-28T18:29:10+5:30

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari celebrated Holi : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी खास पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली.

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari celebrated Holi at his residence in Uttarakhand | VIDEO : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी साजरी केली होळी, पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका!

VIDEO : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी साजरी केली होळी, पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका!

Next
ठळक मुद्देहोळी, धूलिवंदन हा पारंपरिक सण आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील होळीच्या सणावर कोरोना प्रादुर्भावाचे संकट आहे.

देहरादून : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यात होळी (Holi 2021) आणि धुलीवंदनाचा सण साजरा करण्याबाबत काही निर्बंध घातले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी खास पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. यावेळी पारंपरिक वाद्य आणि नृत्य पार पडले. तसेच, फुलांची उधळणही करण्यात आली. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari celebrated Holi at his residence in Uttarakhand)

यासंदर्भात भगतसिंह कोश्यारी यांनी एक ट्विट केले आहे. "आपला गृह प्रदेश असलेल्या उत्तराखंडमध्ये होल्यारो यांचे निवासस्थानी स्वागत केले आणि कुमाऊँनी खडी होलीमध्ये सहभाग घेतला", असे ट्विट भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करताना आणि टाळी वाजवून वाद्यांना साथ देताना भगतसिंह कोश्यारी दिसून येत आहेत. तसेच, फुलांची उधळण करण्यात आली आहे.

दरम्यान, होळी, धूलिवंदन हा पारंपरिक सण आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील होळीच्या सणावर कोरोना प्रादुर्भावाचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने होळीच्या सणावर लादलेल्या निर्बंध घातले आहेत.

(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चार दिवस वेटिंगवर?; राज्यपाल डेहराडून दौऱ्यावर, भेट लांबणीवर)

होळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नागरिकांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना होळीनिमित्त आवाहन केले आहे. "परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारं होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणानं साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी व निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करूया", असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. याशिवाय, होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

(... म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, संजय राऊतांनी मांडलं नेमकं गणित)

Web Title: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari celebrated Holi at his residence in Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.