Corona Vaccination: लसीकरणात महाराष्ट्र तिसरा; उत्तर प्रदेश अव्वल, तर गुजरात दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:21 AM2021-02-13T04:21:47+5:302021-02-13T07:52:02+5:30

राज्यात ६ लाखांचा टप्पा पूर्ण, यूपी पहिल्या स्थानी

Maharashtra ranks third in Corona Vaccination after up tops gujarat second | Corona Vaccination: लसीकरणात महाराष्ट्र तिसरा; उत्तर प्रदेश अव्वल, तर गुजरात दुसऱ्या स्थानी

Corona Vaccination: लसीकरणात महाराष्ट्र तिसरा; उत्तर प्रदेश अव्वल, तर गुजरात दुसऱ्या स्थानी

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत जवळपास ७५ लाख कोरोना योद्धांना लस देण्यात आली असली तरी या मोहिमेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून ६ लाखांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

लसीकरणात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून,गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. देशातील लसीकरण मोहिमेत १० राज्यांचा ६९% वाटा आहे. देशात आतापर्यंत ७४ लाख ३० हजार ८६६ कोरोना योद्धांना लस देण्यात आली आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात सवार्धिक लसीकरण झाले आहे. मात्र या वेगाने देशातील १३० कोटींपैकी ७५ टक्के जनतेला लस देण्यासाठी बराच काळ जाईल, हे स्पष्ट आहे.

आधी आरोग्य कर्मचाऱी, नंतर कोरोना योद्धे यांना यांचे लसीकरण सुरू असून, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व काही ना काही व्याधी असलेल्यांना लस देण्यात येणार आहे या तिन्हींची संख्या सुमारे ३० कोटी आहे. तिसऱ्या टप्प्यातील तसेच नंतरच्या सर्वांना मोफत लस दिली जाणार की त्यासाठी पैसे द्यावे लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

३३८ कोटींच्या लसींची निर्यात
भारताने ८ फेब्रुवारीपर्यंत ३३८ कोटी रुपयांच्या कोरोना लसींची विविध देशांना निर्यात केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचे ६२.७ लाख डोस भारताने निर्यात केले. 

खासगी रुग्णालयांना परवानगी हवी
लसीकरण वेगाने व्हावे आणि संक्रमण टाळण्यासाठी खासगी रुग्णालये, दवाखाने व लॅब यांची मदत घ्यावी तसेच त्यांना लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाढत आहे.

लाॅकडाऊनचा विचार नाही - राजेश टाेपे
राज्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तुर्तास लाॅकडाऊन लागू करण्याबाबत विचार नाही, असे आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी सांगितले.

६०२ जिल्ह्यांत आठवडाभरात एकही बळी नाही
देशामध्ये लसीकरणाला वेग आलेला असताना विविध राज्यांत ६०२ जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनाचा एकही बळी गेलेला नाही.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कोरोनाचे ९३०९ नवे रुग्ण सापडले, तर ७८ जण मरण पावले.

Web Title: Maharashtra ranks third in Corona Vaccination after up tops gujarat second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.