कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 05:46 AM2020-07-26T05:46:34+5:302020-07-26T05:47:01+5:30

डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल; अनॅलिटिक्ससारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

Mahindra University is ready to technical education to the students | कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने इतर क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत. शिक्षण क्षेत्र या काळात पूर्णपणे आॅनलाइन व्यासपीठावर येत आहे. शिक्षणाच्या पद्धतीत बदल होत असतानाच शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक असल्याची भूमिका घेत महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने स्वत:चे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


हैदराबादमध्ये १३० एकर जागेवर सुरू होणाऱ्या या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम शिकविले जातील.
विद्यापीठाच्या आराखड्याप्रमाणे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात व्यवस्थापन शिक्षण (स्कूल आॅफ मॅनेजमेंट), इंदिरा महिंद्रा स्कूल आॅफ एज्युकेशन, २०२१-२२ मध्ये विधि शिक्षण (स्कूल आॅफ लॉ ), २०२२-२३ मध्ये माध्यम शिक्षण, तर २०२३-२४ मध्ये स्कूल आॅफ डिझाइन सुरू करण्याचा मानस आहे. यामध्ये २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी संस्थेचा समावेश असणार आहे. कोरोनानंतरच्या काळात पारंपरिक शिक्षणापेक्षा मानवतावादाचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या मदतीने मिळालेल्या नोकºया या कोरोना काळातील नुकसानभरपाई ठरू शकतील, असे मत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.


नव्याने उदयाला येणाºया डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा अनॅलिटिक्ससारख्या तंत्रज्ञानासोबत समकालीन अभ्यासक्रमाचा समावेश या स्वायत्त विद्यापीठात असेल. टेक महिंद्रा कंपनीच्या ना नफा भागीदारी तत्त्वावर चालणाºया महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा हे विद्यापीठ भाग असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जपानमधील तज्ज्ञांचीही मदत घेणार
व्यावसायिक शिक्षण, प्रकल्पातून जगताना प्रत्यक्ष येणाºया समस्यांना तोंड देण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या विद्यापीठातून करण्यात येईल. युरोप आणि अमेरिकेतील विद्यापीठांशिवाय जपानमधील तंत्रज्ञानामधील तज्ज्ञांची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पुढील पाच वर्षांत ४००० हून अधिक विद्यार्थी तसेच ३०० हून अधिक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांमधील
प्रतिभा शोधणार
महिंद्रा विद्यापीठातून कॉर्पोरेट आणि उद्योग जगताला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय तंत्रशिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची गरज असून उद्योगांतील आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधण्याची आवश्यकता आहे. आम्ही या विद्यापीठामधून नेमके तेच करणार आहोत.
- विनीत नायर,
अध्यक्ष महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन

Web Title: Mahindra University is ready to technical education to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.