कोलकाता: पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर लगेचच पूर्व किनारपट्टीला यास या चक्रीवादळाने (Yass Cyclone) तडाखा दिला. ओडिसा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांतही यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचे हवाई सर्वेक्षण केले. तसेच राज्यांत झालेले नुकसान आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकही घेत आहेत. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकाल दिला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित केल्याने ममता बॅनर्जी नाराज झाल्याचे समजते. (mamata banerjee refused to attend meeting with pm modi over yaas cyclone)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कालीकुंडा येथील आढावा बैठकीमध्ये सहभागी होण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. कालीकुंडा येथील बैठकीत यास चक्रीवादळात झालेले नुकसान आणि अन्य माहितीची कागपत्रे घेऊन ममता बॅनर्जी जाणार असल्याचे समजते. ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयामुळे राज्य आणि केंद्रातील तणाव वाढू शकतो, अशी चर्चा आहे.
“हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका
पंतप्रधान मोदींकडून आढावा
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीयमंत्री आणि बंगालमधून खासदार असलेले देबाश्री चौधरी, केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत. यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यातील भागांचे मोठे नुकसान झाले आहे.
नवे नियम सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठीच, युझर्सनी घाबरू नये: रविशंकर प्रसाद
पश्चिम बंगालमध्ये ३ लाख घरांचे नुकसान
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एक कोटी जनता प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. १५ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, ३ लाख घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.