कोलकाता - नाकरिकत्व संशोधन विधेयक आणि एनआरसीवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक आहेत. या दोन्ही कायद्यांवरून ममता बॅनर्जी दररोज दहा किमी पायी यात्रा काढून जनतेच्या मनात या कायदद्यांसंदर्भात काय आहे हे जाणून घेत आहे. या यात्रेच्या माध्यमातून ममता एका दडगात अनेक पक्षी मारण्याच्या प्रयत्नात आहेत.
नागरिकत्व संशोधन विधेयकावरून ममता यांनी याआधीच दक्षिण आणि उत्तर कोलकात्यात पायी यात्रा केली आहे. त्या दररोज 10 किमी यात्रा करून लोकांशी संवाद साधत आहेत. या पायी यात्रेतून ममता आपले अनेक उद्देश साध्य करण्याच्या प्रयत्नात आहेत.
ममता बॅनर्जी आपल्या पायी यात्रेतून अल्पसंख्यांक समुदायाला आपल्याकडे आकर्षीत करू इच्छित आहेत. तसेच भद्रलोक समाजाला आणि युवक वर्गाला आपल्यासोबत घेण्याचा मनोदय ममता यांचा आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यातील वर्चस्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. लोकसभेला तृणमूल 43 हून 22 वर आले आहे. तर भाजपने 18 जागांवर विजय मिळवला आहे.
दरम्यान पायी यात्रेतून मध्यम वर्गीय आणि सुशिक्षीत मतदारांना आपल्याकडे वळवल्यास, भाजपविरुद्ध लढा देणे सुकर होईल, याची ममता यांना जाण आहे. एकूणच त्यांची पायी यात्रा अनेकार्थी तृणमूलसाठी फायदेशीरच ठरणार आहे.