धमकी : एक कोटी रुपये आणि शस्त्रे द्या अन्यथा बॉम्ब स्फोटाद्वारे स्थानके उडवून देऊसमस्तीपूर : माओवाद्यांनी समस्तीपूर रेल्वे मंडळाकडे एक कोटी रुपये व शस्त्रांची मागणी कराच्या स्वरुपात केली आहे. बिहारमधील माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी) या निर्बंध घातलेल्या माओवादी संघटनेच्या माओवाद्यांनी दिलेल्या या धमकीनंतर भारत-नेपाळ सीमेवरील रेल्वेमंडळाच्या विविध स्टेशन्सवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. मंडळाचे सुरक्षा आयुक्त कुमार निशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमसीसी कमांडरच्या नावाने दोन-तीन दिवसांपूर्वी रेल्वे व्यवस्थापकांना एक पत्र मिळाले होते. त्यात एक कोटी रुपये, ५० कार्बाईन, ५० रायफल्स, ५० एसएलआर व तीन हजार काडतुसे देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास मोतीहारी, पनियहवासह अन्य रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती. या घटनेमुळे रेल्वे मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस अधिक्षकांना पत्र पाठविले असून त्यांना या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्यास सांगितले आहे. ही कुणीतरी केलेली खोडी असावी अशी शक्यता निशांत यांनी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)प्रमुख स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढच्भारत-नेपाळ सीमेवरील रेल्वे मंडळाच्या सर्व प्रमुख स्थानकांमध्ये व रेल्वे रुळांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दल, सरकारी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपास मोहीमही राबविली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
माओवाद्यांची हिंमत; रेल्वेकडेच मागितली खंडणी
By admin | Published: January 22, 2015 3:05 AM