राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी असलेल्या कपिल जैन यांनी पुण्यातून एमबीए केले आणि त्यानंतर ते एशियन पेंट्स या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागले. त्यांचे वार्षिक पॅकेज 17 लाख रुपये होते. 5 वर्षांपूर्वी कपिल यांनी मुंबई सोडली आणि घरी परतले आणि गुलाबाची लागवड करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. 38 वर्षीय कपिल कोटा येथील महावीर नगरमध्ये राहतात. त्यांच्या गावाचे नाव बनियावी असून तेथे त्यांचे वडील शेती करायचे.
कपिल यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. कपिल यांनी गावात राहून दहावीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी कोटा येथून 12वी उत्तीर्ण केली आणि जयपूरला जाऊन पदवी मिळवली. 2006 मध्ये कपिल यांनी एमबीए केले. याच दरम्यान कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कपिल यांना एशियन पेंट्स कंपनीत मार्केटिंग मॅनेजरची नोकरी मिळाली. 2012 मध्ये कपिल जैन यांचे लग्न झाले आणि ते कुटुंबासह मुंबईत राहू लागले. जेव्हा त्यांच्या पत्नीला कोटाच्या ग्रामीण बँकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनी 2018 मध्ये मुंबई सोडली आणि कोटा येथे राहू लागले.
कपिल यांच्या कुटुंबाकडे कोटामध्ये जमीन होती. कपिल यांनी सांगितले की, गाव बनियावी शहरापासून 35 किलोमीटर दूर आहे. ते रोज त्यांच्या शेतात जाऊन काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असे. यात त्यांच्या एका नातेवाईकाने मदत केली. कपिल यांना शेती करायची होती, पण त्यांच्या काकांनी सांगितले की, शेतीत पीक बिघडण्याची शक्यता आहे. म्हणूनच असे काहीतरी करा ज्यामध्ये पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाही. काकांकडून प्रेरणा घेऊन कपिल यांनी गुलाब जलचा प्लांट लावण्याची योजना आखली.
2018 मध्ये कपिल यांनी कोटा येथेच भाड्याच्या कारखान्यात गुलाब जलचा प्लांट लावला. त्यासाठी शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घेऊन पाणी तयार करायचे. मात्र लग्नसराईच्या काळात गुलाबाचे दर वाढायचे, त्यामुळे त्यांचे नुकसान होते. यानंतर कपिल यांना आपल्या शेतात गुलाबाची लागवड करण्याचा प्लॅन केला. 2019 मध्ये कपिल यांनी गुलाबाची लागवड सुरू केली. त्यांची वार्षिक उलाढाल 15 लाख रुपये आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"