दिल्ली MCD निवडणुकीआधी भाजपाने पुन्हा एकदा एक स्टींग व्हिडीओ जारी केला आहे. यासोबतच आपवर तिकीट विकल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा हे वारंवार आपच्या नेत्यांचं स्टिंग समोर आणत आहेत. काँग्रेसमधून आपमध्ये गेलेल्या बिंदू यांचं स्टिंग करण्यात आलं. जे रोहिणीच्या वॉर्ड 55 डीशी संबंधित आहेत. संबित पात्रा यांनी व्हिडीओ जारी करून बिंदू यांच्याकडून तिकीटासाठी तब्बल 80 लाख मागण्यात आल्याचं म्हटलं आहे.
बिंदू यांनी सर्व पैसे एकत्र देण्यास सांगण्यात आलं. पण त्यांनी पहिला 21 लाख नंतर 40 लाख आणि नंतर 20 लाख देईन असं म्हटलं आहे. पण पूर्ण पैसे द्यायचे आहेत असं सांगून त्यांना ते नाकारण्यात आलं. याआधी आठ नेत्यांनी पूर्ण पैसे दिले आहेत. याआधी अँटी करप्शन ब्रांचने तिकिट विकल्याचा आरोपात एका भाजपा नेत्याचा मेव्हणा आणि पीएसह तीन लोकांना अटक केली आहे. कमला नगरच्या व़ॉर्ड नंबर 69 मध्ये ही घटना घडली आहे.
आप कार्यकर्त्या शोभा खारी यांनी आपकडे तिकीट मागितलं होतं. शोभा यांनी आरोप केला आहे की, MLA अखिलेश पति त्रिपाठी यांनी तिकीट देण्यासाठी 90 लाख मगितले. त्यानंतर 35 लाख रुपये त्रिपाठी यांनी आणि 20 लाख रुपये वजीरपूरच्या राजेश गुप्ता यांना दिले होते. तर 35 लाख तिकीट मिळाल्यावर द्यायचे होते. पण लिस्ट जारी झाल्यानंतरही शोभा यांचं नाव आलं नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"