मेहबुबा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री बनण्याचे संकेत

By admin | Published: November 14, 2015 01:27 AM2015-11-14T01:27:01+5:302015-11-14T01:27:01+5:30

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री बनविण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Mehbooba hints at becoming the Chief Minister of Jammu and Kashmir | मेहबुबा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री बनण्याचे संकेत

मेहबुबा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री बनण्याचे संकेत

Next

जम्मू : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री बनविण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचे मुख्यमंत्री बनणे हा लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग आहे; परंतु याबाबत कोणताही निर्णय पक्षच घेणार आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांच्या बैठकीनंतर याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सईद यांनी गुरुवारी म्हटले होते. मेहबुबा यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाध्यक्ष म्हणून फार चांगले काम केले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच पक्षाच्या पारड्यात एवढ्या मोठ्या संख्येत मते पडली. त्या सतत राज्याच्या लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच पक्ष राज्यातील लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, असे सईद यांनी पत्रकारांना सांगितले.
(वृत्तसंस्था)
जम्मू : पाकिस्तानसोबत समेट घडवून आणणे सत्तारूढ पीडीपी-भाजपा आघाडीच्या अजेंड्यावरच आहे; परंतु ही एक विकास पावणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत शेजारी देशांसोबत समेट घडवून आणण्याचा हा अजेंडा आपण सतत पुढेच नेत राहणार, असे सईद यांनी स्पष्ट केले. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.
मोदींनी पाकिस्तानसोबत समेट घडवून आणण्याबाबत भाष्य केलेले नसतानाही त्यांची श्रीनगर येथील सभा ऐतिहासिक सभा होती, असे आपण का म्हणालात, असे विचारले असता सईद म्हणाले, पाकिस्तानबद्दल बोलण्यासाठी मोदींवर कसलाही दबाव नाही. त्यांचे सर्व लक्ष राज्याच्या विकासावर आहे. तुम्ही (मीडिया) थेट निष्कर्षावर पोहोचू नका. प्रत्येक गोष्ट ही एक विकास पावणारी प्रक्रिया आहे.

Web Title: Mehbooba hints at becoming the Chief Minister of Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.