श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर काश्मीर दौऱ्यावरून निशाणा साधला आहे.
जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर अजित डोवाल दुसऱ्यांदा बुधवारी काश्मीर खोऱ्यात दाखल झाले आहे. यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित डोवाल यांना लक्ष्य केले आहे. गेल्या दौऱ्यावेळी फोटो सेशन दरम्यान लंचमध्ये बिर्याणी होती. यावेळी हलीम आहे का? असा सवाल मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
अजित डोवाल जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच, जम्मू-काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच अजित डोवाल जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी राज्यातील विविध ठिकाणच्या परिस्थितीची त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर अजित डोवाल यांनी शोपियनमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला. तसेच, त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला होता.