यावर्षी 6500 कोट्यधीश भारत सोडून जाणार; 'या' देशात राहण्याची योजना, नेमकं काय कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:17 PM2023-06-14T18:17:27+5:302023-06-14T18:37:53+5:30
आपला देश सोडून परदेशात जाणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Millionaires Leave India: आपला देश सोडून चांगल्या देशात वास्तव्यास जाणे सामान्य बाब आहे. भारतातून दरवर्षी हजारो लोक परदेशात राहायला जातात. नागरिकांनी इतर देशांमध्ये स्थायिक होण्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार, 2023 मध्ये 6500 श्रीमंतांनी देश सोडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत(75000) ही संख्या कमी आहे.
2022 मध्ये 7500 भारतीयांनी देश सोडला
जगभरात संपत्ती आणि गुंतवणूक स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्लेच्या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये आपला देश सोडून इतर देशांमध्ये वास्तव्यास जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमधून या वर्षी 13,500 श्रीमंतांचे स्थलांतर होण्याची अपेक्षा आहे. या यादीत ब्रिटन तिसर्या क्रमांकावर आहे. इथून या वर्षी 3200 लोक देश सोडून जाण्याची शक्यता आहे. रशिया 3 हजार लोकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
जगभरातील श्रीमंतांच्या पलायनाचा ट्रेंड
तज्ञांचे असे मत आहे की, श्रीमंतांनी देश सोडणे ही फार चिंतेची बाब नाही. यामागचा युक्तिवाद असा आहे की, 2031 पर्यंत करोडपतींची लोकसंख्या सुमारे 80 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असेल. यामुळे देशातील वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रातून सर्वाधिक करोडपती निर्माण होतील.
श्रीमंत लोक आपला देश का सोडतात?
श्रीमंत लोक आपला देश का सोडतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. भारतातील करसंबंधित नियमांमधील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून जातात. जगभरातील श्रीमंतांना दुबई आणि सिंगापूरसारखी ठिकाणे सर्वात जास्त आवडतात, कारण श्रीमंत लोक अशा देशात जाणे पसंत करतात, जेथे कर संबंधित नियम लवचिक आहेत.