2002 गुजरात दंगलीची चौकशी करणा-या मोदींची एनआयए महासंचालकपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 05:54 PM2017-09-18T17:54:46+5:302017-09-18T18:01:39+5:30
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात (एसआयटी) त्यांचा समावेश होता, विशेष म्हणजे 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीची त्यांनी चौकशी केली होती.
नवी दिल्ली, दि. 18 - ज्येष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी.मोदी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विदयमान महासंचालक शरद कुमार यांचा कार्यकाळ 30 अक्टूबर 2017 रोजी संपणार आहे. कुमार निवृत्त झाल्यानंतर वाय.सी.मोदी महासंचालकपदाचा कार्यभार सांभाळतील.
YC Modi has been appointed new Director General of National Investigation Agency(NIA)
— ANI (@ANI) September 18, 2017
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात (एसआयटी) त्यांचा समावेश होता, विशेष म्हणजे 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीची त्यांनी चौकशी केली होती. सीबीआयचे विशेष संचालक म्हणून ते सध्या काम पाहात आहेत.
वाय.सी.मोदी(आईपीएस 1984) होंगे @NIA_India के नए डीजी। pic.twitter.com/FCVJ4ucjYB
— Janak Dave (@dave_janak) September 18, 2017
1984 च्या आसाम-मेघालय बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणूनही मोदींची ओळख आहे. जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी गटांकडून वाढत्या कुरापती आणि दगडफेकीची एनआयए चौकशी करत असताना मोदी यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे हे विशेष.