बांगलादेशनं भारताला प्रगतीच्याबाबतीत खरंच मागे टाकलं आहे का? केंद्रानं संसदेत दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:51 PM2021-07-20T15:51:34+5:302021-07-20T15:52:13+5:30

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला बांगलादेशच्या होणाऱ्या प्रगतीवरुन सातत्यानं प्रश्न विचारले जात आहे.

Modi govt tells if Bangladesh is set to surpass India’s per capita income in 2021 | बांगलादेशनं भारताला प्रगतीच्याबाबतीत खरंच मागे टाकलं आहे का? केंद्रानं संसदेत दिलं उत्तर...

बांगलादेशनं भारताला प्रगतीच्याबाबतीत खरंच मागे टाकलं आहे का? केंद्रानं संसदेत दिलं उत्तर...

googlenewsNext

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला बांगलादेशच्या होणाऱ्या प्रगतीवरुन सातत्यानं प्रश्न विचारले जात आहे. बांगलादेशच्या दरडोई उत्पनावरुन विरोधी पक्षानं केंद्र सरकारला धारेवर धरलं. त्यावर केंद्र सरकारनंही प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या वर्षी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) दरडोई उत्पन्नामध्ये बांगलादेश भारतालाही मागे टाकण्याची शक्यता आहे, असा अहवाल प्रकाशित केला होता. याच मुद्द्यावरुन संसदेत रणकंदन सुरू आहे. (Modi govt tells if Bangladesh is set to surpass India’s per capita income in 2021)

केंद्र सरकारनं दिलं उत्तर
आयएमएफनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार खरंच बांगलादेश २०२१ मध्ये दरडोई उत्पन्नात भारताला मागे टाकणार आहे का? असा सवाल सरकारला विचारण्यात आला. त्यावर सरकारकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बाजू मांडली. आयएमएफ आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकच्या (WEO) अहवालानुसार भारतात दरडोई सकल राष्ट्रीय उप्तन्नाचा (GDP) अंदाज व्यक्त करायचा झाल्यास एप्रिल २०२१ मध्ये ७३३२.९ अमेरिकी डॉलर इतका होता. तर बांगलादेशमध्ये हाच आकडा ५८११.६ अमेरिकी डॉलर इतका होता. यावरुन भारतच पुढे असल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती पंकज चौधरी यांनी संसदेत दिली. 

आयएमएफ काय सांगतं?
आयएमएफच्या माहितीनुसार एप्रिल २०२१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था १२.५ टक्के इतक्या दरानं वाढली आहे. हा आजवरचा विक्रम आहे, असं पंकज चौधरी म्हणाले. भारताचं दरडोई उत्पन्न २०१६ साली बांगलादेशपेक्षा ४१ टक्क्यांनी अधिक होते. त्यावेळी भारताचं दरडोई उत्पन्न ५८३९.९ अमेरिकी डॉलर, तर बांगलादेशचं ४११८.९ अमेरिकी डॉलर इतकं होतं. 

यंदाच्या वर्षात बांगलादेश सरकारकडून काही आकडे जारी करण्यात आले. त्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास बांगलादेश दरडोई उत्पन्नात भारतापेक्षा पुढे निघून गेला आहे. बांगलादेश सरकारच्या दाव्यानुसार देशातील दरडोई उत्पन्न २२२७ डॉलर पर्यंत पोहोचलं आहे. हाच आकडा २०१९-२० या वर्षात २०६४ डॉलर इतका होता. भारताशी तुलना केल्यास दरडोई उत्पन्नाचा भारताचा आकडा १९४७.४१ डॉलर इतका आहे.

विश्लेषकांनी बांगलादेशचे आकडे नाकारले
दरम्यान, भारतीय अर्थ विश्लेषकांनी बांगलादेश सरकारनं जारी केलेले आकडे नाकारले आहेत. एका परदेशी वित्तीय कंपनीत काम करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञाच्या माहितीनुसार बांगलादेश एक लेबर इंटेसिव्ह एक्सपोर्ट इकोनॉमीवर आधारलेला देश आहे. त्यामुळे तो भारताला मागे टाकू शकेल असा विचार करणं चुकीचं आहे. भारतात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित होत असताना बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या आकड्यांची तुलना केली जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. 

Web Title: Modi govt tells if Bangladesh is set to surpass India’s per capita income in 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.