‘भारत जोडो’त ‘मोदी-मोदी’ घोषणा, राहुल गांधींनी काय केलं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:36 AM2022-11-29T06:36:30+5:302022-11-29T06:37:19+5:30
मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा सहावा दिवस आहे. ही यात्रा २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात आहे. शहरातील सांवेर रोडजवळ यात्रेदरम्यान काही तरुणांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. ‘मोदी-मोदी’च्या घोषणा ऐकून राहुल गांधी तिथेच थांबले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना बोलावून आणण्यास सांगितले. हे समजताच घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढला. मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा सहावा दिवस आहे. ही यात्रा २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली आहे.
माझी प्रतिमा खराब करण्यासाठी...
राहुल गांधींनी भाजपवर मोठा आरोप केला. ते म्हणाले की, भाजप माझी प्रतिमा खराब करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले की, हे दोन्ही नेते आमची संपत्ती आहेत. याचा राजस्थानमधील भारत जोडो यात्रेवर परिणाम होणार नाही याची मी खात्री देतो.