उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींना इशारा देताच, मोदींचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:00 AM2019-12-09T11:00:47+5:302019-12-09T11:01:23+5:30
उपराष्ट्रपतीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मोदी म्हणतात, दिल्ली बलात्काराची राजधानी होत असून यामुळे जगात भारताची बदनामी होत आहे.
नवी दिल्ली - देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरून मोठा गदारोळ सुरू आहे. दररोज बलात्काराच्या घटना घडत असल्यामुळे देशातील वातावरन दुषीत झाले आहे. याचे पडसाद संसदेत उमटत आहेत. माहिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदा संमत करून फायदा नसल्याचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांना इशारा दिला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांकडून त्या संदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केवळ कायदा संमत करणे अत्याचाराच्या घटनांवर समाधन होऊ शकत नाही. त्यासाठी प्रशासकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याचे नमूद करताना नायडू यांनी राहुल गांधींना देशाचे नाव खराब करू नका, असा इशारा दिला. सिंबायोसीस इंटरनॅशनल युनिवर्सिटीच्या 16व्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.
Vice President M Venkaiah Naidu: Bad name is coming to India. Somebody said India is becoming capital of so & so, I don't want to get into that. We should never denigrate our country and we should also not get into politics in such a matters of atrocities. pic.twitter.com/PpdkOF1tjR
— ANI (@ANI) December 8, 2019
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना धर्म किंवा राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. त्यामुळे मुळ मुद्दा बाजुला जाईल. बलात्काराच्या घटनांमुळे देशाची बदनामी होत असून देश बलात्काराची राजधानी झालीय, असा उल्लेख काहीजन खरत आहेत. मी त्यात पडू इच्छित नाही. मात्र देशाची प्रतिमा खराब करू नये, तसेच अत्याचाराच्या घटनांचे राजकारण करू नये, अशी टीका नायडू यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
दरम्यान उपराष्ट्रपतीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मोदी म्हणतात, दिल्ली बलात्काराची राजधानी होत असून यामुळे जगात भारताची बदनामी होत आहे.
No Somebody....It is Modi ji.... pic.twitter.com/7faklR95Qa
— Rohan Kadam (@RMK_Speaks) December 8, 2019