ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींकडून ‘विकास होबे’ उत्तर, पुरुलियात भाजपसाठी पहिली प्रचारसभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:36+5:302021-03-19T06:41:11+5:30
दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली.
पुरूलिया (प. बंगाल) :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खेला होबे (खेळ होईल) या विधानसभा निवडणुकीच्या बहुचर्चित घोषणेला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारील त्यांच्या पुरुलिया येथील राज्यातील पहिल्या प्रचारसभेत विकास होबे (विकास होईल) असे उत्तर दिले. (Modi's 'Vikas Hobe' reply to Mamata's 'Khela Hobe', first campaign rally for BJP in Purulia)
दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत तृणमूल हाफ झाली, आता साफ होईल, अशीही तोफ डागली. प. बंगाल विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पुरूलियात मोदींनी गुरूवारी सकाळी घेतली आणि दुपारी आसाममध्ये करीमगंज येथे सभा घेतली.
शिशिर अधिकारी अमित शहांना भेटणार
- भाजपवासी झालेले शुभेन्दू अधिकारी यांचे वडील तृणमूलचे एक संस्थापक व खासदार शिशिर कुमार अधिकारी हेही भाजपच्या वाटेवर आहेत.
- ते २१ मार्चला गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ शकतील, असे शुभेन्दू अधिकारी यांनी सांगितले. मोदी यांची नंदीग्राम येथे २० तारखेला सभा होणार आहेत. त्यावेळीही ते हजर राहू शकतील.
ट्रान्स्फर माय कमिशन
केंद्रातील भाजप सरकार डीबीटी म्हणजे गरजूंना थेट मदत करणारी डायरेक्ट ट्रान्स्फर बेनेफिट योजना राबविते, तृणमूल काँग्रेस मात्र लोकांना लुटण्याचे काम करते, असे सांगताना मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव टीएमसी अर्थात ट्रान्सफर माय कमिशन असल्याची घणाघाती टीका केली.