सूरतच्या जिल्हा रुग्णालयातून एक सर्वात चांगली बातमी समोर येत आहे. याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेनं नवजात बालकाला जन्म दिला. जन्मापासून गंभीर अवस्थेत असलेल्या या बाळानं १९ दिवस मृत्यूशी झुंज देऊन आजारातून बरा झाला आहे. जन्माच्या वेळीच आईला गमावलेल्या नवजात बाळाला वाचवण्यासाठी सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे या बाळाला जीवदान मिळालं आहे.
कोरोनाशी लढणाऱ्या १९ दिवसीय बाळाचं नाव त्याच्या नातेवाईकांनी अभय ठेवण्याचा विचार करत आहेत. सामान्य रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मांगरोल परिसरात राहणारी रूची पांचाळ हिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर तिला ६ मे रोजी सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वार्डात भरती केल्यानंतर रुचीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ११ मे रोजी रुचीला खूप त्रास जाणवला तेव्हा डॉक्टरांनी या गर्भवती महिलेची डिलीवरी केली.
डिलीवरीच्या दरम्यान आईचा मृत्यू
या गर्भवती महिलेचं सीझर करत असताना रुचीची तब्येत अचानक ढासळली. ऑपरेशनवेळी आईला वाचवता आलं नाही परंतु तिने नवजात बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळ रडत नव्हतं. त्याला नळीद्वारे दूध पाजलं. बाळाला व्हेंटिलेटर ठेवलं होतं. सतत उपचारानंतर त्याला ऑक्सिजन आणि त्यानंतर एअर रुममध्ये आणलं गेले. अखेर २९ मे रोजी बरं झाल्यानंतर नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
वर्षाअखेरपर्यंत सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण
केंद्र सरकारने या वर्षाअखेरपर्यंत सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यासाठी लस उत्पादन वाढविण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. ऑगस्टपर्यंत दरमहा २० ते २५ कोटी डोसचे उत्पादन होणार असून, आयात आणि इतर युनिटमधून आणखी पाच ते सहा कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. यासोबतच आता दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याच्या चाचणीचाही सरकार विचार करीत असल्याची माहिती राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूहाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली.