शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक- उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 09:54 AM2020-02-13T09:54:52+5:302020-02-13T10:05:44+5:30
मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे.
मुंबईः मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजेंनीही या प्रकारावरून कमलनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे JCBने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले ते प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे. स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार, असंही ट्विट करत उदयनराजे म्हणाले आहेत. ट्विटच्या शेवजी जय शिवराज असंही उदयनराजेंनी नमूद केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे JCB ने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आहे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 13, 2020
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते, मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते, असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला आहे. त्याचसोबत शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का?, त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा सवाल महाराष्ट्र भाजपानं उपस्थित केला आहे. आता संभाजीराजे छत्रपतींनी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार!
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 13, 2020
जय शिवराय!