देवबंदमध्ये २५ राज्यातून मुस्लीम संघटना एकटवल्या; पोलिसांचा चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:33 AM2022-05-28T11:33:18+5:302022-05-28T11:33:31+5:30

या संमेलनात देशातील सध्याच्या परिस्थितीवर, ज्ञानवापी मस्जिदसह विविध धार्मिक स्थळावरील वादग्रस्त मुद्दे, समान नागरी कायदा, मुस्लीम वक्फ, मुस्लीम शिक्षणावर चर्चा होणार आहे

Muslim organizations from 25 states converged; Issues like Gyanvapi, Qutub Minar, Shri Krishna Janmabhoomi will be discussed | देवबंदमध्ये २५ राज्यातून मुस्लीम संघटना एकटवल्या; पोलिसांचा चोख बंदोबस्त

देवबंदमध्ये २५ राज्यातून मुस्लीम संघटना एकटवल्या; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Next

सहारनपूर - उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं मुस्लीम संघटना जमियत उलमा ए हिंदचं मोठे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी जमियतचा झेंडा फडकवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या संमेलनात देशातील २५ राज्यातील जवळपास २ हजाराहून अधिक मुस्लीम संघटना एकत्र आल्या आहेत. २८ आणि २९ मे रोजी हे संमेलन चालेल. देवबंदच्या ईदगाह मैदानात सगळ्या मुस्लीम संघटना एकवटल्या आहेत. 

या संमेलनात प्रामुख्याने ज्ञानवापी-शृगांर गौरी वाद, कुतुबमीनार आणि श्रीकृष्ण जन्मभूमीसारख्या धार्मिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जमियतचं संमेलन माजी खासदार मौलाना महमूद मदनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. जमियत उलमा ए हिंदच्या कार्यक्रमात २५ राज्यातील लोक सहभागी होणार आहेत. त्यात मुख्य महाराष्ट्रातून मौलाना नदीम सिद्दीकी, यूपीहून मौलाना मोहम्मद मदनी, तेलंगानागहून हाजी हसन, मणिपूर मौलाना मोहमद सईद, केरळ जकरिया, तामिळनाडूहून मौलाना मसूद, बिहारहून मुफ्ती जावेद, गुजरातहून निसार अहमद, राजस्थानहून मौलाना अब्दुल वाहिद खत्री, आसामहून हाजी बसीर, त्रिपुराहून अब्दुल मोमीन पोहचले आहेत. त्याचसोबत खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल, पश्चिम बंगालचे मंत्री मौलाना सिद्दीकी उल्लाह चौधरी, शूरा सदस्य मौलाना रहमतुल्लाह कश्मीर यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगालहून बहुतांश मुस्लीम संघटना यात सहभागी झाल्या आहेत. 

या संमेलनात देशातील सध्याच्या परिस्थितीवर, ज्ञानवापी मस्जिदसह विविध धार्मिक स्थळावरील वादग्रस्त मुद्दे, समान नागरी कायदा, मुस्लीम वक्फ, मुस्लीम शिक्षणावर चर्चा होणार आहे. जमियत उलमा ए हिंदचे जिल्हा महासचिव जहीद अहमद यांनी सांगितले की, मौलाना महमूद मदनी यांच्या अध्यक्षतेखाली होणारे संमेलन तीन टप्प्यात होईल. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा विनिमय होईल त्यानंतर अंतिम टप्प्यात विविध ठराव पास केले जातील असं त्यांनी सांगितले. 

जमियत उलेमा-ए-हिंदच्या परिषदेत देशाच्या विविध राज्यांतून जमियतशी संबंधित लोकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे पाच एकर जागेत संपूर्ण कव्हर एसी मंडप तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये अडीच टनाचे २० हून अधिक एसी बसवण्यात आले आहेत. हॉटेल व्यतिरिक्त ईदगाह मैदानात बांधण्यात आलेल्या मंडपात पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अतिरिक्त बल आणि LIU सतर्क 
पोलीस प्रशासनानेही परिषदेची पूर्ण तयारी केली आहे. देशभरातून येणारे शिष्टमंडळ आणि उलामा यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यातून अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे. तर मंडप आणि आसपासचे एलआययू देखील सतर्क राहतील. एसएसपी आकाश तोमर यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाने परिषदेची सर्व तयारी केली आहे. संमेलनस्थळी एक कंपनी पीएसी, तीन पोलिस निरीक्षक, दहा उपनिरीक्षक, सहा महिला हवालदार आणि ४० कॉन्स्टेबल तैनात असतील.

Web Title: Muslim organizations from 25 states converged; Issues like Gyanvapi, Qutub Minar, Shri Krishna Janmabhoomi will be discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.