नवी दिल्ली - केंद्र सरकार देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत निवेदन केले. यावेळी मोदींनी कलम 370, तिहेरी तलाक, रामजन्मभूमीवरून भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
मोदी पुढे म्हणाले की, विरोधकांना वाटते की नागरिकता संशोधन कायदा आणण्याची एवढी घाई का केली. काही म्हणतात आम्ही हिंदू-मुस्लीम करत आहोत. देशातील नागरिकांना विभागण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही भाषा पाकिस्तानची आहे. या लोकांना मुस्लिमांमध्ये भ्रम निर्माण करायचा आहे. मात्र त्याचा उपयोग होणार नसल्याचे मोदींनी सांगितले.
दरम्यान काँग्रेससाठी देशातील जे लोक मुस्लीम आहेत. ते आमच्यासाठी भारतीय आहे. आम्हाला आठवण करून देण्यात येते की, भारत छोडो आणि जय हिंदचा नारा देणारे मुस्लीम होते. येथेच अडचण आहे. काँग्रेससाठी हे लोक कायम मुस्लीम होते. मात्र आमच्या दृष्टीने हे लोक केवळ भारतीय आहेत, असं मोदी म्हणाले.
यावेळी मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. त्याकाळी कोणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते, म्हणूनच देशाची फाळणी करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.