‘द मुथूट ग्रुप’ आणि अमिताभ बच्चन यांची हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 08:54 PM2018-02-12T20:54:12+5:302018-02-12T20:54:55+5:30
भारतामधील व्यवसाय क्षेत्रात मोठा दबदबा असणाऱ्या ‘द मुथूट ग्रुप’ने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून निवड केली आहे
नवी दिल्ली - भारतामधील व्यवसाय क्षेत्रात मोठा दबदबा असणाऱ्या ‘द मुथूट ग्रुप’ने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून निवड केली आहे. ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेते बच्चन यापुढे ‘द मुथूट ग्रुप’च्या राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धी अभियानाचे एक भाग राहतील. आपल्या पाच दशकांमधील कारकिर्दीमध्ये बच्चन यांनी सुमारे १९०हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची करामत दाखवली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच नव्हे तर जागतिक चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेते म्हणून ते ओळखले जातात.
‘द मुथूट ग्रुप’चे उपव्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर जॉर्ज या महत्त्पूर्ण हातमिळवणीबद्दल म्हणाले, “द मुथूट ग्रुप’साठी ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून अमिताभ बच्चन यांनी प्रतिनिधीत्व करणे याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. बच्चन हे चित्रपटाच्या रुपेरी पडद्याबरोबरच पडद्याबाहेरदेखील ‘लिव्हिंग लेजंड’ आहेत. आपली मूल्ये आणि वारसा यांचा संगम बच्चन आपल्या रुपेरी पडद्यावरील अभिनयात घडवतात. विशेष बाब म्हणजे मूल्ये आणि वारसा या दोन्ही गोष्टींना ‘द मुथूट ग्रुप’ने नेहमीच महत्त्व दिले आहे. बच्चन यांनी आपल्या देदीप्यमान कारकिर्दीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, त्याप्रमाणेच आमच्या संस्थेनेही १८ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले कसब दाखविले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रांमधील आमचे काम अर्थपूर्ण आहे.”
अमिताभ बच्चन यांची घट्ट सामाजिक भूमिका आमच्या व्यवसायाच्या संस्कृती आणि परंपरेशी मिळतीजुळती आहे. आमच्या विविध शाखांपैकी तब्बल ४५००हून अधिक म्हणजे ७० टक्के शाखा ह्या ग्रामीण भारतामध्ये कार्यरत आहेत. दररोज आम्ही २ लाखांहून अधिक ग्राहकांची सेवा करतो. एका परीने हे राष्ट्रउद्धाराचेच काम आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील ही हातमिळवणी आमच्या संस्थेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि विविध पिढ्यांमधील चाहत्यांच्याही पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे.”
या हातमिळवणीबद्दल विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले, “व्यावसायिक क्षेत्रात गेल्या १३१ वर्षांपासून आपल्या मूल्यांशी तडजोड न करता उत्कृष्ट काम करणारी एक संस्था म्हणून ‘द मुथूट ग्रुप’ प्रसिद्ध आहे. त्यामुळे या संस्थेशी जोडले जाण्याची गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.