माझी शाळा ! आपल्या प्राथमिक शाळेच्या कठड्यावर बसले राज्यपाल कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 08:30 PM2021-11-06T20:30:30+5:302021-11-06T20:33:02+5:30
चेताबगढ दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्राथमिक विद्यालय चेताबगढ या शाळेला भेट दिली. राज्यपाल कोश्यारी यांचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले.
देहरादून - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या हटके स्वभावामुळे आणि कृतीशिलतेमुळे ते माध्यमांमध्येही चर्चेचा विषय असतात. कधी राजभवनातील भेटीगाठींमुळे तर कधी सिंहगड पायी चालत सर केल्यामुळे राज्यापालांचे कौतुक होते. राज्यपालांना आपल्या मायभूमीबद्दलही मोठा अभिमान आहे. म्हणूनच, उत्तराखंड राज्यातील आपले जन्मगाव असलेल्या नामती चेताबगढ येथे जाऊन त्यांनी आपल्या प्राथमिक शाळेला भेट दिली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज उत्तराखंड येथील चेताबगढ, जि. बागेश्वर येथील आपल्या प्राथमिक शाळेला भेट दिली. पाचवीपर्यंतचे शिक्षण त्यांचे याच शाळेत झाले. यावेळी राज्यपालांनी ओसरीवर बसून गतस्मृतींना उजाळा दिला. pic.twitter.com/OsjRRAwdie
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 6, 2021
चेताबगढ दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्राथमिक विद्यालय चेताबगढ या शाळेला भेट दिली. राज्यपाल कोश्यारी यांचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. यावेळी राज्यपालांनी शाळेच्या ओसरीवर बसून गतस्मृतींना उजाळा दिला. चेताबगढ हे गाव बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तालुक्यात आहे. राज्यपाल कोश्यारी यांनाही आपल्या शाळेच्या कठड्यावर बसण्याचा मोह आवरता आला नाही.