नरेंद्र गिरी यांनी फाशीसाठी शिष्याहाती मागवली दोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 08:52 AM2021-09-25T08:52:51+5:302021-09-25T08:56:29+5:30

सर्वेश याचे म्हणणे असे की, “महंत गिरी या दोरीने फाशी घेणार आहेत, असे मला जाणवले असते तर मी कधीही दोरी त्यांना आणून दिली नसती.” महंत नरेंद्र गिरी सोमवारी प्रयागराजमध्ये त्यांच्या बाघम्बरी मठात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. दुपारी जेवण घेतल्यानंतर ते विश्रांती घेत असत.

Narendra Giri called rope through the disciple for execution | नरेंद्र गिरी यांनी फाशीसाठी शिष्याहाती मागवली दोरी

नरेंद्र गिरी यांनी फाशीसाठी शिष्याहाती मागवली दोरी

Next

नवी दिल्ली : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम आहे. नरेंद्र गिरी यांनी त्यांचा शिष्य सर्वेश याला ओले कपडे वाळवण्यासाठी नायलॉनची दोरी आणण्यास सांगितले होते. याच दोरीने गिरी यांनी फाशी घेतली.
 
सर्वेश याचे म्हणणे असे की, “महंत गिरी या दोरीने फाशी घेणार आहेत, असे मला जाणवले असते तर मी कधीही दोरी त्यांना आणून दिली नसती.” महंत नरेंद्र गिरी सोमवारी प्रयागराजमध्ये त्यांच्या बाघम्बरी मठात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. दुपारी जेवण घेतल्यानंतर ते विश्रांती घेत असत. सायंकाळी ते शयन कक्षातून बाहेर यायचे. रोज सायंकाळी ५ वाजता त्यांना मंदिरात जावे लागे. ते जेव्हा बाहेर आले नाही व दार वाजवल्यानंतरही ते उघडले गेले नाही तेव्हा त्यांचा शिष्य सर्वेश द्विवेदी आणि इतर शिष्यांनी दार तोडले. सर्वेश आत आल्यावर त्याला नरेंद्र गिरी यांनी नायलॉनची दोरी छताच्या पंख्याला अडकवून फाशी घेतल्याचे दिसले.
 

Web Title: Narendra Giri called rope through the disciple for execution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.