नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री उशीरा केलेल्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली. येत्या रविवारी सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करण्याचा मानस मोदींना केला आहे. मात्र अनेक मोदी चाहत्यांनी त्यांना हा निर्णय बदलवावा अशी मागणी करत आहेत. पण नेमकं नरेंद्र मोदीसोशल मीडियावरील अकाऊंट का बंद करतायेत? याबाबतच्या चर्चेंना उधाण आलं आहे.
सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन सांगितले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फॅन फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे. कोट्यवधी युजर्स नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेशी संवादही साधतात, मग त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला हे अद्याप समजू शकले नाही. पण नरेंद्र मोदींनी याप्रकारचं ट्विट केल्यानंतर अनेक शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ट्रेंड पण सुरु करण्यात आला आहे. जवळपास ५० हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय का घेतला. पण या उत्तरासाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण स्वत: नरेंद्र मोदीच याचं उत्तर देतील. मात्र काही शक्यता सोशल मीडियावर वर्तवली जात आहे.
स्वदेशी सोशल मीडिया येणार ?पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ट्विटनंतर ही शक्यता वर्तवली जात आहे. नरेंद्र मोदींनी नेहमी मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिलं आहे. अशात रविवारी भारत स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करु शकतो असं बोललं जातं आहे. त्यामुळे गुगलला टक्कर देण्यासाठी भारताचा गुटरगू नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येईल असं व्हायरल होत आहे.
विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवणेसध्या परीक्षेचे दिवस सुरु असल्याने विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी असं सांगितले असावे अशीही चर्चा आहे.
दिल्ली हिंसाचाराने व्यथितगेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी मोदी व्यथित आहेत. २६ फेब्रुवारीला त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केले होते. मात्र रविवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावरील अफवांमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं.
समाजाला शिकवण त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृत्यातून लोकांपर्यंत संदेश पोहचवण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावरील अकाऊंटमुळे लोकांनी एकमेकांना भेटणे बंद केले आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकांतपणा वाढत चालला असल्याने या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना एकत्रित येण्याबाबत शिकवण दिली असेल अशी चर्चाही लोकांमध्ये सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार
द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी
‘निर्भया’च्या चारही खुन्यांची आजची फाशीही टळली
घटना घडून गेल्यावर आम्ही फारसे काही करू शकत नाही
फाशी ढकलली जाणे, हे व्यवस्थेचे अपयश, निर्णयावर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया