'जो हिटलरच्या मार्गावर चालेल, तो हिटलरप्रमाणे मरेल', काँग्रेस नेत्याची PM मोदींवर वादग्रस्त टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:25 PM2022-06-20T15:25:18+5:302022-06-20T15:25:29+5:30
काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे.
नवी दिल्ली:काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे. काँग्रेसकडून 'अग्निपथ' योजनेविरोधात आयोजित केलेल्या निदर्शनात बोलताना सहाय यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचे नाव घेऊन पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
#WATCH | Modi will die Hitler's death if he follows his path, says Congress leader Subodh Kant Sahay at party's 'Satyagrah' protest against ED questioning of Rahul Gandhi & Agnipath scheme in Delhi pic.twitter.com/fO8LfRShvK
— ANI (@ANI) June 20, 2022
'हिटलरप्रमाणे मरतील...'
काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याचे नाव घेऊन पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना सुबोधकांत सहाय म्हणाले की, 'हिटरले त्याच्या सैन्यात अशाच प्रकारची एक योजना आणली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरच्या मार्गावर चालत असतील, तर त्यांचा हिटलरप्रमाणे मृत्यू होईल. मोदींनी हे लक्षात ठेवावे,"असे सहाय म्हणाले.
#WATCH | Subodh Kant Sahay speaks on his earlier statement, 'Modi will die Hitler's death if he follows his path'
Says "...Ask Narendra Modi, he too must have raised this slogan. It's a slogan- jo Hitler ki chaal chalega, wo Hitler ki maut marega. Ask him what path is he taking" pic.twitter.com/JrY4iFo2wY— ANI (@ANI) June 20, 2022
'आमची सरकारे पाडली'
यापूर्वी सुबोधकांत सहाय म्हणाले की, 'आमची दोन-तीन निवडून आलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपने केले आहे. मदारीच्या रूपात आलेले नरेंद्र मोदी या देशात हुकूमशाह झाले आहेत. मला वाटतं हिटलरचा सगळा इतिहास यांनी घेता आहे. या वक्तव्याच्या काही वेळानंतर सुबोधकांत सहाय यांनी लगेचच आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "नरेंद्र मोदींना विचारा, त्यांनीही हेच म्हटले होते. जो हिटलरच्या मार्गाने जाईल, तो हिटलरप्रमाणे मरेल. त्यांना विचारा ते कोणता मार्ग निवडत आहेत."