नौदल कर्मचाऱ्यांना फेसबुक वापरण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:05 AM2019-12-31T02:05:51+5:302019-12-31T02:06:05+5:30
हेरगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर भारतीय नौदलाने आपल्या कर्मचाऱ्यांना फेसबुक वापरण्यास बंदी घातली
नवी दिल्ली : भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील हँडलरला दिल्याबद्दल ११ खलाशांना अटक झाली व हेरगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर भारतीय नौदलाने आपल्या कर्मचाऱ्यांना फेसबुक वापरण्यास बंदी घातली आहे.
हेरगिरीचे रॅकेट या महिन्यात १९ तारखेला आंध्र प्रदेश गुप्तचर विभागाने उघडकीस आणले. त्यांनी असा दावा केला की, २०१७ मध्ये जे खलाशी सेवेत दाखल झाले ते हनी ट्रॅपमध्ये सापडल्यानंतर त्यांनी पाणबुड्या आणि नौदल जहाजांच्या ठिकाणांची माहिती दिली. या तरुण खलाशांशी आधी तीन ते चार महिलांनी फेसबुकवर पहिल्यांदा संपर्क साधला. नंतर या महिलांनी या तरुणांना आॅनलाईनवर एका व्यक्तीची ओळख करून दिली. ही व्यक्ती प्रत्यक्षात पाक हँडलर होती. त्याने खलाशांकडून माहिती मिळवायला सुरुवात केली.