नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे लोकसभेतील गटनेते तारीक अन्वर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने दिल्लीला हलवण्यात आले आहे.
कटिहारचे लोकसभा सांसद असलेले 66 वर्षीय तारीक अन्वर यांची सोमवारी अचानक प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीने पटना येथील स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. उलट प्रकृती अधिक बिघडली. त्यामुळे आज त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांच्यासोबत पी ए संगमा आणि तारिक अन्वर हे काँग्रेसबाहेर पडले होते. त्यावरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापकांपैकी एक आहेत. बिहारमधील कटिहार मतदारसंघातून ते निवडूण आले आहेत.